पुणे विभागाच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे.
उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे ह्या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, शालेय क्रीडा स्पर्धांचा आयोजन, तसेच क्रीडा आणि युवकांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवणे समाविष्ट आहे.
प्रिय क्रीडाप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित सर्व मान्यवर,
क्रीडा ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची नव्हे तर मानसिक दृढतेची, शिस्तीची आणि संघभावनेची शिदोरी आहे. युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवून सक्षम, आरोग्यदायी व चारित्र्यसंपन्न समाज घडविणे हेच आमचे ध्येय आहे.
क्रीडा विभागाच्या विविध उपक्रमांतून ग्रामीण ते शहरी अशा सर्व स्तरांवर खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्पर्धा जिंकणे किंवा हरवणे यापेक्षा खेळामधून शिकलेली जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा उपयोग जीवनयात्रेत महत्त्वाचा ठरतो.
आपल्या सर्व क्रीडाप्रेमींना, खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! चला, खेळाडूवृत्ती जपत आपण महाराष्ट्राला व देशाला जागतिक क्रीडा नकाशावर नावलौकिक मिळवून देऊया.
आपल्या सहभागासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद!