विभागीय क्रीडा संकुल

विभागीय क्रीडा संकुल,पुणे

विभागीय क्रीडा संकुल, पुणे यांची सविस्तर माहिती
राज्य शासनामार्फत युवकांच्या सर्वांगीण शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या पुणे मध्ये एक अत्याधुनिक विभागीय क्रीडा संकुल विकसित करण्यात आले आहे.
क्रीडा संकुलाकरिता प्राप्त जागा:
विभागीय क्रीडा संकुल पुणे हे सर्व्हे नं.191,गेनबा मोझे शाळेच्या समोर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा,पुणे 411006 या ठिकाणी 7.38 एकरमध्ये बांधण्यात आलेले आहे. क्रीडा संकुलाकरिता प्राप्त अनुदान - शासन निर्णय दिनांक 21 मार्च 2009 अन्वये रु.24.00 कोटी निधी मंजूर असून 24.00 कोटीतील रुपये 4.00 कोटी निधी जिल्हा क्रीडा संकुल बारामती पुणे यांना देण्यात आलेला आहे. 20.00 कोटी निधी विभागीय क्रीडा संकुल समितीस प्राप्त झालेला असनू 20.00 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.क्रीडा संकुलात उपलब्घ सुविधा - विभागीय क्रीडा संकुलात खालील सुविधा उपलब्ध असून सदरच्या सुविधा संबंधित संस्थेस करार पध्दतीने भाडेतत्वावर वापण्यास देण्यात आलेल्या आहेत.
क्रीडा संकुलात उपलब्ध सुविधा:

अ.क्र. क्रीडा सुविधा मैदानांची संख्या सुविधा वापरत असलेली संस्था
1 बॅडमिंटन हॉल 04 कोर्ट अश्वमेध स्पोर्टस
2 जलतरण तलाव 01 चॅम्पीयन पुल्स, पुणे
3 लॉन टेनिस कोर्ट 03 आदर पुनावाला
4 बास्केटबॉल कोर्ट 01 श्री. संजय सावंत बास्केटबॉल ॲकेडमी
5 क्रिकेट इनडोअर व आऊटडोअर अर्बन ईन्फ्राकॉन, पुणे
6 कबड्डी 01 साई स्पोर्टस ॲकडमी
7 बॉक्सींग हॉल स्टार बॉक्सींग अकॅडमी, पुणे
8 योगा हॉल आदयम योगा
9 तायक्वांदो हॉल इंडो दोजा ॲकडमी, पुणे
या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून युवकांना दर्जेदार व आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होत असून, त्यांच्या खेळातील कौशल्याचा विकास होण्यास मदत होत आहे. यामुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खेळाडू घडण्यास हातभार लागणार आहे.

क्रीडा संकुल

पुणे विभाग अंतर्गत जिल्हा व तालुका क्रीडा संकुल माहिती

क्रमांकजिल्ह्याचे नाव डाऊनलोड करा
1 अहिल्यानगर जिल्हा व तालुका क्रीडा संकुल यादी व माहिती
2 सोलापूर जिल्हा व तालुका क्रीडा संकुल यादी व माहिती
2 पुणे जिल्हा व तालुका क्रीडा संकुल यादी व माहिती